सिल्लोड, (प्रतिनिधी): श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात संपन्न झालेल्या बाल आनंद नगरीत चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा येथेच्च आस्वाद घेतला.
शनिवार १० जानेवारी रोजी संपन्न झालेल्या मेळ्यात प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालयातील मिळून विविध प्रकारच्या ७८ खाद्यपदार्थांचा आस्वाद विद्यालयातील चिमुकले तसेच पालकांनी घेतला. या बाल मेळाव्यात जवळपास ६५ ते ७० हजारांची उलाढाल झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर डवणे व विजय राजपूत, गायत्री बोरसे, ज्योती राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी मुख्याध्यापक कृष्णा सपाटे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन डमाळे, पर्यवेक्षक निशांत म्हस्के यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख मधुकर मगर, गजानन दौड, श्रीमती संगीता तायडे श्रीमती संगीता काळे, लक्ष्मण कोलोड, नरेशशिंग राजपूत, रमेश परदेशी, गणेश चव्हाण, अमोल ताटु, अंगद काळे, भास्कर सागरे, अरविंद सोनवणे, पंकज सावंत, नम्रता वडमारे, हर्षदा सनांसे, राजू गाढवे, अमोल दांडगे भाऊसाहेब गावंडे, गणेश सुरडकर, अमोल पालोदकर, रामेश्वर वाघ, शितल गीते, सुवर्णा तारो, मीरा पांगळे, सोनाली जाधव तसेच शिपाई रमेश सपकाळ, शैलेश मोरे यांनी परिश्रम घेतले.














